"सन्मान" वयोवृद्धांसाठी स्थळ "अस्तित्व संस्था"

अस्तित्व ही ४१ वर्षाचा अनुभव असलेली मतिमंद आणि मूक-कर्णबधिर मुलांच्या शैक्षणिक, शारीरिक प्रगतीचे काम करते. मुलांना व्यवसाय मार्गदर्शन देत त्यांचे पुनर्वसन, पायावर आर्थिक क्षमतेने उभे राहण्याचा उपक्रम पण राबवते. मतिमंद ४०-५० मुलांचे वसतिगृह संस्था ३० वर्षे चालवत आहे.

संस्थेची ५० हजार स्केअर फुट वास्तू आहे. अपंगत्वाचा विचार करताना लक्षात आले की, वृद्धत्व हे सर्व अपंगत्वाचे, व्याधीचे मिश्रण आहे. वयोवृद्धाना कमी दिसते, कमी ऐकू येते, थोडेफार विस्मरण होते, तसेच शारीरिक हालचाली पण मंदावलेल्या असतात, त्यामुळे विश्वस्तांच्या मनामध्ये ह्या वयोवृद्धांच्या उर्वरित आयुष्यात सन्मानाने, आनंदाने आणि कष्ट विरहित जगण्यासाठी संस्थेत शक्य असेल तेवढ्यांची सोय करण्याचा विचार मनात आला.

संस्था पहिल्या वास्तूतील तळमजला आणि पहिला मजला ह्या उपक्रमासाठी उपलब्ध करून देऊ शकते हे लक्षात आले. सुरुवातीस तळमजल्यावर तीस जणांची सोय होऊ शकेल. कालांतराने पहिल्या मजल्यावर ३५ जणांची सोय करणे शक्य आहे, हे प्रत्येक मजले अंदाजे ८००० स्केअर फुट आहेत.

सध्या बऱ्याच कुटुंबातील तरुण व्यक्ती अर्थाजनासाठी परदेशी आहेत. इथे राहणाऱ्या आपल्या पालकांची त्यांना काळजीने वाटत असते परंतु नाईलाजास्तव ते परदेशी जातात अशा पाल्यांचा विचार करून त्यांना देखील कोणत्याही प्रकारे पालकांची काळजीने करावी लागणार नाही अशा हेतूने हा उपक्रम सुरु केला आहे.

संस्थेतील ह्या उपक्रमात प्रवेश सर्व जाती धर्मासाठी खुला आहे.

साठ वर्षावरील वयोवृद्धाना प्रवेश दिला जाईल. प्रवेशाच्या वेळी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांचाच विचार करण्यात येईल. प्रवेश देण्याचा संपूर्ण अधिकार अस्तित्वच्या विश्वस्तांनी नेमलेल्या "सन्मान" च्या कमिटीला असेल. प्रवेशाच्या वेळी आधारकार्ड, पॅनकार्ड, फॅमिली डॉक्टरांचे सर्वसाधारण मानसिक व शारीरिक क्षमतेच्या स्थैर्याचे सर्टिफिकेट, रेशनकार्ड इत्यादीच्या झेरॉक्स प्रती आणि पासपोर्ट साईज ३ फोटो आवशक्यक आहेत.

प्रवेश घेणाऱ्यानी तीन जणांचे जामीन, गार्डियन किंवा कोणी जबाबदारी घेणारी परिवारातील व्यक्ती अश्या तीन जणांची नावे देणे गरजेचे आहे. ऍंग्रीमेंटच्या वेळी या सर्वांचे पण आधारकार्ड, पॅनकार्ड, पत्ता यांचे झेरॉक्स प्रती व २ फोटो ऍंग्रीमेंटवर सही करताना लागतील.

शक्यतो छोट्या मोठ्या आर्थिक गोष्टींसाठी जामीनदाराची गरज पडू नये म्हणून आणि उपक्रम यशस्वी होण्यासाठी, आर्थिक सक्षम तहहयात स्वतःच्या रहाण्याच्या खर्चाची, औषधांची, बेडरीडन झाल्यास स्पेशल अटेंडंट, अथवा हॉस्पिटलाइज झाल्यास तो खर्च स्वतः कोणावरही अवलंबून न रहता स्वतःच्या पेन्शन तसेच इंन्व्हेस्टमेन्टच्या माध्यमातून सन्मानाने, सुखाने, सक्षम असणाऱ्यांसाठी काढण्याचा संस्थेचा मानस आहे.

परंतु संस्थेतील वास्तव्याच्या काळात निवासी व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास, मृत्यू झाल्यास अथवा निवासी व्यक्तीने आत्महत्या केल्यास व्यवस्थापनास जबाबदार धरता येणार नाही. अर्थात अश्या प्रसंगी व्यवस्थापन, जामीन, गार्डियन, नातेवाईक यांच्या सह्या आणि फोन नंबर ऍंग्रीमेंटमध्ये आहेत, त्यांना फोनद्वारे परिस्थितीची जाणीव करून देण्यात येईल.

संबंधितांनी तातडीने निवासी व्यक्तीची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार व्यवस्थापन निवासी व्यक्तीस योग्य हॉस्पिटलमध्ये भरती करेल. त्यापुढील जबाबदारी, देखभाल, खर्च, विमा हफ्ता, हॉस्पिटल मधील अटेंडंट, डॉ. व्हिजीटस, मेडिकल तपासण्या, लॅबोरेटरीची टेस्ट, इ. खर्च आणि देखभाल यांची जबाबदारी तीन जामिनांची असेल. दुर्दैवाने वयोमानानुसार अथवा कोणत्याही कारणाने निवासी वयोवृद्धाचे निधन झाल्यांनतर जबाबदार व्यक्तींना कळवूनपण ते न आल्यास आठ तासानंतर मानपाडा पोलीस स्टेशनला माहिती देऊन त्यांच्या सल्ल्यानुसार संबंधितांचा अंतिम संस्कार संस्था करेल. खर्च त्यांच्या डिपॉझीटमधून वजा केला जाईल. त्या महिन्यातील देण्या- घेण्याचा व्यवहार पूर्ण करून उर्वरित रक्कम निवासी व्यक्तीने नॉमिनेट/ will नुसार केलेल्यास १ ते २ महिन्यात देण्यात येईल.

सन्मानमध्ये प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीस प्रवेश आणि करार करताना रु. दोन लाख डीपॉझीट द्यावे लागेल. दरमहाचा रु.२५०००/- खर्चाचा धनादेश दर महिन्याच्या दिनांक १ ते ५ या कालावधीत देणे अपेक्षित आणि बंधनकारक असेल. यात महिना पंचवीस हजाराचा खर्च निवासी व्यक्तींसाठी पहाटेचा चहा/ कॉफी/ दुध, नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी नाष्टा, चहा, रात्रीचे जेवण यासाठी असेल. हे सर्व करण्यासाठी शक्यतो केटरर संख्या पाहून नेमण्यात येईल अथवा संस्थेमार्फत सोय करण्यात येईल.

२४ तास सेवेसाठी निवासी व्यक्तींच्या संख्येनुसार कर्मचारी उपलब्ध असतील. दिवसासाठी एक व रात्रीसाठी एक मॅनेजर (आपणास आपल्या घरातील एक नातेवाईक, अथवा मुलगा या भूमिकेतून सहकार्यासाठी, गप्पांसाठी, मार्गदर्शनासाठी) असेलच. इलेक्ट्रिसिटी, वॉटर इ.इ. गोष्टींचा विचार करता वरील रक्कम न्याय आहे, असे विश्वस्तांना वाटते.

अस्तित्वने ४१ वर्षे तीनशे/ साडेतीनशे विद्यार्थ्यांकडून टर्म फी व्यतिरिक्त काहीही घेतलेले नाही. समाज माध्यमातून आणि काही विश्वस्तांच्या अथक प्रयत्नांमुळे ही संस्था फायद्याचा विचार ना करता सामाजिक बांधिलकीने इतके वर्ष काम करीत आहे.

तसेच हा नवीन उपक्रम संस्था आर्थिक फायद्यामुळे नव्हे तर ६०/६५ सशक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींसाठी एक सहावा उपक्रम आत्मिक समाधानासाठी करत आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास संस्था मुरबाड, सरळगाव अशा ठिकाणी दुसरे युनिट मध्यमवर्गीयांसाठी काढेल.

प्रत्येक निवासी व्यक्तीस सेमी फाऊलर बेड, लॉकर, स्वतंत्र कपाट, पलंगास मच्छरदाणीसाठी रॉड, प्रत्येक खोलीमध्ये १ टेबल खुर्ची असेल. संस्थेच्या अतिशय प्रसन्न वातावरणात नाष्टा मिळण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. डायनिंग रूम, टेलिव्हिजन, म्युझिक सिस्टिम, कॅरमबोर्ड, चेसबोर्ड, पत्ते खेळणे, बॅटबिंटनकोर्ट विथ रॅकेट्स, मिनी रॅकेट्स, मिनी जिम, टेबल टेनिस या सुविधा उपलब्ध केल्या जातील.

अस्तित्व संस्था आपणास खोटे आश्वासन देऊ शकत नाही. रोज योगा, रोज हास्य क्लब, रोज देवांच्या आरत्या, रोज कोणाचेतरी प्रवचन किंवा कोण विद्वानाचे मार्गदर्शनपर भाषण. आपणास डोकेदुखी होणारे करणार आहे.

प्रत्येक निवासी व्यक्तीचा वाढदिवस व्यवस्थापनातर्फे राजेशाही पद्धतीने साजरा करण्यात येईल. संबंधित वाढदिवस असलेल्या व्यक्तीस त्याच्या परिवारातील ५ ते ६ नातेवाईकांना आणण्यास मुभा असेल, त्यादिवशी त्या नातेवाईकांच्या जेवणाचा खर्च संस्था करेल.

निवासी व्यक्तींच्या कोणाही नातेवाईकांस भेटण्यास राहण्यास, भोजन इ.इ. यावयाचे असेल तर निदान २४ तास आधी व्यवस्थापनास कळवले तर सोयीचे होईल.

संस्थेत प्रवेश घेताना प्रत्येकाने त्यांच्या फॅमिली डॉक्टर अथवा कन्स्लटंट यांनी देत असलेल्या औषधांच्या प्रिसक्रिपश्नची कॉपी संस्थेत देणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्यांची औषधे संपल्यास त्यांच्या खर्चाने आणून दिली जातील. आज पर्यंत जशी औषधे ते घरी घेत होते तशी त्यांनी घेणे अपेक्षित आहे. या कामासाठी नर्सची गरज कालांतराने पडल्यास तिचे चार्जेस संबंधित निवासी भरेल.

निवासी व्यक्तीच्या प्रवेशाच्या वेळी तो शुद्धीत असताना मेडिकल अथवा सर्जिकल समस्या उद्धवल्यास त्याने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्यवस्थापन करेल. आयत्यावेळेच्या परिस्थितीनुसार व्यवस्थापनास वेगळा निर्णय घ्यावयाचा वाटला आणि जरी त्याचे दुष्परिणाम झाले तरी संस्थेचा काहीही स्वार्थी हेतू नाही, हे समजणे गरजेचे आहे. अशा प्रसंगी नातेवाईकांनी कोणती कायदेशीर वकिली फिर्याद करणार नाही असे संस्थेत प्रवेश घेताना लिहून देणे अपेक्षित आहे.

संस्थेला जर फक्त वृद्धाश्रमच काढायचा असता तर १ बीएचके, १आरके, वन रूम असा कधीच काढला असता पण अस्तित्व स्कूल ऑफ हॅंडीकॅप च्या वास्तूतील अतिरिक्त सोळा हजार स्केअर फुट या जागेत शाळेतील खोल्यांमध्ये तीन किंवा मिनी हॉल मध्ये ५ ते ६ जणांची अशी सुंदर सोय होईल. म्हणून एका व्यक्तीस एक खोली हा उपक्रम देऊ शकत नाही.

करमणूक

"सन्मान" या वास्तूतील निवासी व्यक्तीस किंवा काही व्यक्तींना जो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांना नाटक पाहण्यासाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात किंवा एखाद्या सिनेमागृहात जाऊन पाहण्याची इच्छा असेल तर लेखी अर्जानंतर परवानगी देता येईल. त्या सर्वानी व्यवस्थितपणे जाऊन परत येण्याची जबाबदारी त्यांची असेल. यासाठी वेगळ्या रजिस्टरमध्ये या गोष्टींची नोंद व्यवस्थापन करेल, अर्थात तिकिटांचा खर्च संबंधित करतील.

एक दिवसाची वर्षातून एकदा सहल योग्य निवासींना घेऊन केली जाईल. काही कर्मचारी आणि काही विश्वस्त सुद्धा सहभाग घेतील. यासाठीचा लागणारा खर्च व्यवस्थापन करेल.

अस्तित्व संस्थेत धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, वैज्ञानिक अश्या अनंत विषयावरील पुस्तके लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा वापर नोंदणी करून सर्व निवासी घेऊ शकतात. दररोजच्या घडामोडी राज्य आणि देशातील समजण्यासाठी आवश्यकतेनुसार मराठी, हिंदी, गुजराथी आणि इंग्लिश या भाषेतील वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. दरवर्षी निदान चांगले ७ ते ८ दिवाळी अंक पण उपलब्ध करून देण्यात येतील.

महाराष्ट्रामधील बहुतेक वयोवृद्धांसाठीच्या निवासी ठिकाणी केवळ शाकाहारी जेवण हाच कायदा असतो. अश्या संस्थेतून कित्येक वृद्ध आयुष्यभर शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ खात असतात. अश्यांना आयुष्याच्या सायंकाळी यापासून वंचित ठेवणे केळवळ नियमांवर बोट ठेऊन हे त्यांच्यासाठी क्लेशदायी आहे, म्हणून हि संस्था आधुनिक जीवनशैलीचा विचार करून मांसाहार खाऊ इच्छिणाऱयांना अधून मधून बाहेरून आणून देऊन त्यांच्याही मुखावर प्रसन्नता पाहू इच्छिते.

"सन्मान" ह्या वास्तूत सिगारेट, तंबाखू, गुटका, नशेली पदार्थ सेवनास सक्त मनाई असेल. तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीस सिगारेट पिण्याची तलफ आल्यास त्याला ती स्मोकिंग झोनमध्ये जाऊन ओढावी लागेल.

आपला हा वृद्धाश्रम आर्थिकदृष्ट्या वैयक्तिक सक्षम असलेल्यांसाठी असल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीचा विचार करून हि संस्था काही दूरदर्शी निर्णय खालीलप्रमाणे घेत आहे. आयुष्यभर ज्यांनी अपेय पान केले आणि ज्यांची परवानगी असल्यास आजही करण्याची इच्छा आणि क्षमता आहे त्यांनी कायदेशीररीत्या त्यासाठी लागणारा परवाना मिळवून देण्यास संस्था सहकार्य करेल, अश्या सभासदांची व्यवस्था एकत्रितपणे करणे सहज शक्य आहे. त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. अर्थात ह्या साठीचा खर्च संबंधितांनी करायचा आहे. या सुविधेमुळे समस्या वाढल्यास ही सुविधा तात्काळ बंद करण्याचा अधिकार कोणत्याही चर्चेविना "सन्मानच्या" व्यवस्थापनास आणि अस्तित्व संस्थेच्या विश्वस्तांना असेल.

अस्तित्व संस्थेतील वास्तव्यासाठी आलेल्या व्यक्तीस येथील व्यवस्था, अन्नाचा दर्जा, स्वच्छता अथवा काही गोष्टीची न आवडल्याने हा वृद्धाश्रम सोडून दुसरीकडे जायचे असल्यास त्यांची अडचण संस्था करणार नाही. एक महिन्याची आगाऊ नोटीस देऊन, आर्थिक व्यवहार करून डीपॉझीटची उर्वरित रक्कम चेक द्वारे त्यांना देऊन मुक्त केले जाऊ शकते. उद्देश कोणासही येथे कैदी म्हणून बंदिस्त ठेवणे हा उद्देशच नाही. मनापासून येथे रहावे हि इच्छा असणाऱ्यांसाठी हि वास्तू आहे.

ह्या वृद्धाश्रमात राहणाऱयांच्या सूचनांचे स्वागत व विचार "सन्मान वृद्धाश्रम" कायम करेल. त्यासाठी निवासी लोकांनी त्यांचे तीन प्रतिनिधी, तीन वर्षांसाठी नियुक्त करून तसे लेखी पत्र व्यवस्थापनास दिलेल्या व्यक्तींबरोबरच व्यवस्थापन चर्चा करेल. तुमच्या भल्यासाठी हि कमिटी जी अपेक्षा आणि मुद्दे व्यवस्थापना समोर सादर करेल त्याचा सन्मानच होईल.

आपण ह्या वास्तूत घरात रहात असल्याप्रमाणे राहून सुख समाधानाने तहहयात सुखाने, रामनामाचे नाम घेत शांतपणे निवृत्त होणे हीच इच्छा सर्व वयोवृद्धांची, गरीब, श्रीमंत, अतिश्रीमंत, यांची असते, तसेच व्हावयास हवे.

"अस्तित्व संस्थेच्या" सन्मान नामक वृद्धाश्रम ५०/६० सशक्त वृद्धांसाठीच्या प्रयत्नास परमेश्वर आशीर्वाद देवो हे अपेक्षा. आज पर्यंत ४१ वर्षे जसा परमेश्वर या संस्थेच्या पाठीशी उभा राहिला तसाच तो हा उपक्रम अस्तित्व संस्थेचा यशस्वी करेल याबद्दल संस्थेच्या विश्वस्तांना तिळमात्रही शंका नाही.

संस्थेच्या काही खोल्यात AC हवा असल्यास अश्यांना एकत्रितपणे ठेवता येईल. तो खर्च संबंधित शेअर करतील. संस्था ब्युटीफीकेशनसाठी अवास्तव खर्च करणार नाही.नाव नोंदणीच्या वेळेस वस्तू व सुविधा पाहूनच नोंदणी करावी म्हणजे नंतर वाद-विवाद होणार नाही.

४० वर्षाच्या यशस्वी वाटचाली नंतर आता आपल्या डोंबिवली शहरात मध्यवर्ती ठिकाणी अस्तित्वच्या शांत व प्रशस्त आवारात सुरु करीत आहोत वृद्धाश्रम.

 
३५ बेडचा पहिला टप्पा
 
एकट्यासाठी किंवा जोडीदारासहित राहण्याची व्यवस्था
 
चहा नाश्ता सहित जेवणाची उत्तम सोय
 
शेअर रूम/ डॉरमेटरी
 
खेळ, वाचन व्यवस्था
 
ध्यानधारणेसाठी मंदिर
 
वैद्यकिय सेवा जवळच उपलब्ध
 
सर्व सुखसोयींनी युक्त, प्रशस्त वास्तूमध्ये राहण्याची व्यवस्था